सोन्याला गुंतवणुकीचा पर्याय समजण्याची चूक करू नका
तुम्ही माझा मागचा ब्लॉग वाचला असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये सोन्याचा समावेश केलेला नाही. हे अनावधानाने झालं नव्हतं—हे जाणूनबुजून केलं होतं. अनेकजणांचा असा समज (गैरसमज) असतो की सोने हा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे. पण खरं पाहिलं तर, ते जहाजाच्या छिद्रावर लावलेल्या एक परिपूर्ण ठिगळासारखं काम करतं. ते तुमचं जहाज पुढे नेत नाही, पण महागाईमुळे होणारी गळती थांबवण्याचं काम नक्की करतं . कारण: सोनं ही मूल्य जतन करणारी वस्तू आहे — संपत्ती वाढवणारी नाही, तर जपवणारी आहे. ते कोणतेही उत्पन्न देत नाही (ना लाभांश, ना व्याज, ना व्यवसाय वाढ) . ते गंभीर परिस्थितीत संरक्षण देतं (चलन अवमूल्यन, राजकीय अस्थिरता, तीव्र महागाई). दीर्घ काळाच्या दृष्टीने , सोनं फक्त महागाईच्या समोर टिकून राहण्याइतकाच परतावा देते, तर इक्विटी सारख्या मालमत्ता खऱ्या अर्थाने संपत्ती वाढवतात. जर तुमची सर्व संपत्ती सोन्यात गुंतवलेली असेल, तर कदाचित ती वाढणार नाही, पण तिचे मूल्यही कमी होणार नाही. आकड्यांकडे एक नजर टाकूया हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, मी एक साधा Excel फॉर्म्युला व...